Saturday, 20 September 2014

! " स्वप्नातील कासपठार सातारा " !

कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्हयाचा लौकीक नोंदविला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून पर्यटकांची रिघ कास पठाराच्या दिशेने सुरु झाली आहे. या पठाराची माहिती देणारे www.kas.ind.in हे संकेतस्थळ आहे. कास पठार हे वर्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेलया पश्चिम घाटातील 39 ठिकाणापैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदासमोर पश्चिम घाटाला जागतीक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले आहे. त्यातील कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे. कास पुष्प पठाराचे नैसर्गिक आणि निसर्गदत्त देणगीची जोपासना करून या पठाराचा विकास करण्यात वन विभागाने पुढाकार घेतला आहे. कास पुष्प पठाराची जैव विविधता जोपासून ती वाढविण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्थाचा मोठा वाटा आहे. कास पठाराची समुद्रसपाटी पासूनच उंची 1213 मिटर असून पर्जन्यमान अंदाजे अडीच ते तीन हजार मि.मी. इतके आहे. कास पठार हे 1792 हेक्टरवर पसरले असून यामध्ये वनखात्याची 1142 हेक्टर तर खाजगी 650 हेक्टर जमीनीचा समावेश आहे. कास पुष्प पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे 850 पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचा अधिक समावेश आहे. तसेच किटक व विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या 32 प्रजाती आढळतात. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 19 प्रजाती, सस्तन प्राण्याच्या 10 प्रजाती आणि पक्षांच्या 30 प्रजाती येथे आढळून येतात. कास पठार व परिसरात प्रदेशनिष्ठ, दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती आहेत. रेड डाटा बुकमध्ये जवळपास 40 फुले असणाऱ्या प्रजाती कास पठारावर आढळतात. कास पठरावरुन सुक्ष्म हवामान हे जैविक घडामोंडीना उत्क्रांतीला पोषक आहे. कास पठारावर जाणारा प्रत्येकजण येथील विविधांगी फुले आणि वनस्पतीकडे आपोआपच आकर्षिला जातो. कास पुष्प पठारावर पुष्प आणि वनस्पतीमुळे येथील वातावरण रंगीबेरंगी असून कधी पांढरा शुभ्र, कधी लाल, निळा, जांभळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे फुले पर्यटकांच्या डोळयांचे पारणे फेडतात. या फुलांवर पसरणा-या इंद्रधनुष्यीछटा पाहण्यास मिळत असून हा परिसर जणु स्वप्नसृष्टीत पोहोचविणाराच ठरतो. कास पठाराला जाताना नागमोडी वळणे आणि घाट संपताच विस्तीर्ण असे पठार डोळयात भरते, हेच ते ऐतिहासिक प्रसिध्द कास पठार आहे. निसर्गाची देणगी लाभलेल्या कास पुष्प पठाराला डोळयांचे पारणे फिटाव्या अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरले आहे. या पठारावर बोचरा वारा पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असलेल्या हलक्या सरी, गर्द धुके आणि हिरव्यागार विविध रंगाच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे कास पुष्प पठार परिसर जणु धरतीवरचाच स्वर्ग असल्याचा भास येथे येणा-या प्रत्येकालाच होतो. या पुष्प पठारावरील क्षणात सुर्यकिरणांतील इंद्रधनुष्यीछटा तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांचाही हवे-हवेसेपणा प्रत्येकालाच मोहात पाडत असून जणू धुक्यात न्हाऊन जावे अशीच मनोमन इच्छा या परिसराच्या आकर्षणाने होत आहे.महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगर रांगा म्हणजे सह्याद्री, सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसगिर्क खजिनाच महाराष्ट्राला बहाल केला आहे. सह्याद्री म्हणजे जैवविधता असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. जगातील महत्वाच्या अठरा ठिकाणांमध्ये सह्याद्रीचा समावेश होतो. कास पठार हा त्याचाच एक भाग असून त्यास कास पुष्प पठार असेही म्हणतात. कास पठाराला सडाही संबोधिले जाते. या सड्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे 1213 मीटर एवढी आहे. कास पठार हे कातळ खडकाचे कमी प्रमाणात माती व अन्य द्रव्य असलेले पठार आहे. या ठिकाणी झाडे उगवत नाहीत. मात्र पावसाळ्यात रानफुले व पुष्पवैभव सर्वांनाच जादूमय भुरळ घालतात. कास पठारावरील लक्षावधी फुले विविध रंगांनी विविध ढंगांनी उगवतात. निसर्गाचे हे देखणं रुप आता सर्वांनाच मोहात पाडते.कास पठारावर पावसाळा संपता संपता ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात रानफुले येतात. ही रानफुले विविध प्रकारची असतात. हिरव्यागार गालीच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वा-याची झुळुक आली की डोलणारी पांढरी अशी नानाविध रंगाची फुले अक्षरश: मनमोहून टाकतात. यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे दर पंधरा दिवसांनी त्यांचे रंग बदलत असतात. काही फुले दरवर्षी येतात तर काही फुले दर सात वर्षांनी येतात. तर दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी हे तर कास पठाराचे वेगळे वैशिष्ट आहे. हा दैवदुर्लभ योग पाहणारा तसा भाग्यवंत म्हणावा लागेल. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या पठारावर सुमारे 850 पेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार आढळून येतात. यामध्ये फॅमिली, जिनेरा जाती आणि औषधी वनस्पती नोंदविल्या आहेत. जून महिना संपताच कास पठारावर सड्यावरचा चमत्कार दिसू लागतो. बालकवींच्या शब्दात सांगायचे झाल्यास हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे असं हे देखणं रुप म्हणजे कास पठारावरील पुष्पवैभवच आहे. या पठारावर हिरव्यागार मखमली गालिच्याचा रंग मात्र आठ-पंधरा दिवसांनी बदलतो. पांढरा शुभ्र, लाल, निळा, जांभळा, पिवळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे हे पुष्पवैभव डोळ्यांचे पारणे फेडते. या पठारावर जून महिना संपतानाच पांढरे हबे आमरीचे कोंब उगवतात. तसेच दोन तु-याची वायतुरा ही वनस्पती दिसते. हीच ती ऍ़पोनोजेटोन सातारन्सीस म्हणजे सातारा कास स्पेशल फूल. लगेचच पिवळी सोनकी आणि कवळयाची मिकीमाऊस सारखी स्मिथियाची फुले उगवतात. मिकीमाऊस फुले ही पिवळया रंगाची असून ही फुले मिकीमाऊससारखी सतत हातात घेऊन मिरवण्याचा मोह येथे येणा-या प्रत्येकालाच आवरता येत नाही. पण पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनीच मोह टाळून या निसर्गदत्त पुष्प पठाराचे नजरेत संकलन करावे. श्रावणात निळी सीतेची आसवे आणि लाल रंगाची तेरड्याची फुले, मध्ये-मध्ये पांढऱ्या गेंदांच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे फुललेले दिसतात. हे नयनरम्य दृष्य पाहताना प्रत्येकाचे मन हेलावून जाते. या फुलांचा बहर कमी होईपर्यंत पांढरे तुरेवाली आमरी वर येते. मोठ्या तळ्यामध्ये पांढरी छोटी-छोटी कुमुदिनीची कमळे संपूर्ण तलाव झाकून टाकतात. तळयामध्ये जणू साठा करून ठेवल्यासारखी कमळांची फुले असून अलगद एखादा स्नॅप घेऊन तो संग्रही ठेवण्याचा मोह प्रत्येकालाच पडतो. या पठारावर कंदी पुष्पांचे विविध प्रकार निचुर्डी, अबोलिमा, ब्युगोनिया, दीपकांडी, चवर, गौरीहार, रानहळद, आभाळी, नभाळी, हत्तीची सोंड, सापकांदा, नागफणी, शेषगिरी, ड्रॉसेरा इत्यादी नाना प्रकारची फुले उगवतात. कास पुष्प पठारातील जैव विविधा जोपासण्यासाठी पयर्टकांबरोबरच सर्वांनीच स्वत:वर बंधने घालून घेणे गरजेचे आहे. कास पठारावरील विविध जैव विविधतेचे रक्षण करण्यासाठी या परिसरात तार कुंपन उभारण्यात आले असून या पुष्प पठारावर प्रवेश शुल्कही आकारलाही जात आहे. कास संरक्ष्ण समितीच्या वतीने प्रति माणसी 10 रुपये प्रमाणे प्रवेश शुल्क (12 वर्षावरील )आकारले जाते. प्रवेश शुल्क आता ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून यासाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर माहिती मिळेल तसेच forst.satara68@gmail.com या ई-मेल आरक्षणाबाबत संपर्क साधावा. याबरोबरच वाहनांमुळे वाहुक व्यवस्था कोलमोडूनये म्हणून ऑगस्ट ते ऑक्टोंबर या कालावधीत सातारा ते बामणोली रस्त्यावरील कास पठार 15 ते 21 किलोमिटर व राजमार्ग फाटा 0 ते 6 किलो मिटर अंतरात सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत वाहनांना थांबण्यास रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या परिसरात सर्व वाहनांना बंदी केली आहे. काविर्च्या फुलांची झुडपे कास पठारावर मोठ्या प्रमाणावर दर सात वर्षांनी येतात. या फुलांपासून काविर्चा मध मिळतो. काविर्चा मध आयुर्वेदिक म्हणून वापरण्यात येतो. लहान मुले तसेच वयोवृध्द व्यक्ती यांच्यामध्ये कॅल्शियम वाढण्यासाठी काविर्चा मध अत्यंत उपयुक्त आहे. येथील काही वनस्पती दुमिर्ळ असून काही कीटक भक्षी तर काही वनौैषधी आहेत. दरवर्षी येथे देशी - विदेशी शास्त्रज्ञ दुर्मिळ फुलांचा अभ्यास करण्यासाठी तर अलीकडील काही वर्षात मोठया प्रमाणावर पर्यटक नियमितपणे कास पठारला भेट देतात. एकंदरीत सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्प पठाराचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला असून आज देशवासियाबरोबरच परदेशी पर्यटकांना भुरळ घालणाने पुष्पसौदर्य नजरेत साठवून ठेवण्यासारखे आहे. त्यामुळेच कास पुष्प पठार हे प्रत्येकाच्याच जीवनातील एक अपूर्व पर्वणीच ठरत आहे.



Friday, 19 September 2014

! स्वराज्याचा शिलेदार !

स्वराज्याची गौरवगाथा

स्वराज्याचा श्रीगणेशा .........रायरेश ्वरया रायरेश्वराच्या साक्षीनेच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या शपथा घेतल्या. ‘हर हर महादेव’च्या घोषणांमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात या रायरेश्वराने पाहिली.राजकारणामुळे रायरेश्वर सारख्या शिवकालातील महत्त्वाच्या स्थानाची झालेली उपेक्षा त्यांच्या देहबोलीतून वारंवार व्यक्त होत ,..रायरेश्वर म्हटले की, ‘स्वराज्याची स्थापना’ हा इतिहासातील रोमांचकारी प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतोछत्रपती शिवरायांनी त्यांच्या स्वराज्याचा श्रीगणेशा करण्यासाठी या रायरेश्वराचीच निवड केली... त्या दिवशी कुणालाहीचाहूल लागू न देता शिवबा आणि त्यांचे मावळे इथे एकेक करत जमले. कोण होते यामध्ये? दादाजी नरसप्रभू गुप्ते, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सोनोपंत डबीर असे स्वराज्यनिर्मित ीतील बिनीचे शिलेदार! सारे एकेक करत जमले आणि या रायरेश्वराच्या साक्षीनेच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या शपथा घेतल्या. ‘हर हर महादेव’च्या घोषणांमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात या रायरेश्वराने पाहिली.रायरेश्वराच्या पूजाअचेर्ला शिवा जंगम नावाच्या कर्नाटकातील पुजाऱ्याची नियुक्ती झाली होती. त्यांची पस्तीस एक कुटुंबे मंदिराच्या परिसरात आहेतकोट्यावधी रुपये खर्चून मंुबईच्या समुदात शिवाजीमहाराजांच ा भव्य पुतळा बसवण्याचीयोजना साकारत आहे. मात्र शिवरायांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने पावन झालेली सह्यादीच्या कडेकपारीतील अनेक महत्त्वाची ठिकाणं अद्यापही दुर्लक्षीत आहेत,भोर, पेशव्यांचे पंत सचिव शंकरजी नारायण यांचे वैभवशाली संस्थान. सह्यादीच्याडोंगररांगांनी वेढलेला तालुका. लागूनच सातारा आणि रायगड जिल्हा.रायरेश्वर ४५८९ फूट उंच असून पूर्व-पश्चिम असा १६ किलोमीटर पसरला आहे. रायरेश्वर सुरू झालेली ही डोंगररांग शंभू महादेव रांग म्हणून प्रसिद्ध आहे.परंतु मंदिराची अवस्था पाहून इतिहास जनत करून ठेवण्याच्यावृत्तीचा आपल्यामध्ये असलेला अभाव सातत्याने जाणवतराहतो. हवा स्वच्छ असेल तर भोवतालचे १२ किल्ले आणि चार धरणांचे विहंगम दृश्यसहज दृष्टीस पडतेएक ऐतिहासिक आणि थंड हवेचे ठिकाण म्हणूनहीया डोंगराचा विकास होऊ शकतो. महाराष्ट्राच्या पर्यटन खात्याला आता डोंगर किल्ल्यांची आठवण झाली आहे. नाहीतर कोरीगडासारखा हा डोंगरही एखादा खाजगी विकासक केव्हा ताब्यात घेईल हे कळणारही नाही.- जय भवानी जय शिवाजी

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
छायाचित्रे रायरेस्वर मंदिर ( फक्त बीजे )

! " खंडेरायाची सोन्याची जेजुरी " !

जेजुरीसम पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी
अन्‌ तिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी, कडावरी

यळकोट यळकोट जय मल्हार

जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
वाईच्या तू गणराया जागराला या या
पसरणीच्या भैरी देवा जागराला या या

जेजुरगडा वाजे चौघडा वाजे चौघडा
पुणं धरती ही पलिकडं, गड जेजुरी अलिकडं

रूप दावून बानू गेली, स्वारी देवाची येडी झाली
बानूबाईचं याड लागलं, मल्हारी देव मल्हारी

इसरून गेला कुण्या झाडाला भंडारी देव भंडारी
येळकोट येळकोट बोलती हो नितकाय भंडार उधळती
नवलाख पायरी गडाला हो, चिरा जोडिला खडकाला
अवं बोला हो तुम्ही बोला, अवं म्हाळसा नारीला

अन्‌ भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला
मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी

अवं गळा घालितो भंडारी देव मल्हारी
मल्हारी मार्तंड जय मल्हार

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी
बानू नार आणली घरी मल्हारी रुसला का मजवरी
लखलख दिवट्या जळती पाजळली दीपमाळ
रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी

कडेकपारी त्रिशूळ द्वारी वर उधळे भंडार
नाथ निरंजन सद्गुरू स्वामी घेतलासे अवतार
घेतलासे अवतार देवा लोटलासे भंडार
रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी

मल्हार धनी मी म्हाळसा राणी
कर जोडुनी लागतो चरणी
प्रीत नको तुजवरी, प्रीत नको तुजवरी
रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी




@
श्रीक्ष॓त्र जेजूरी मंदिर@

WELCOME GYZ MY BLOG

Mitraho mi hi post lihtoy English madhe pn actually yacha earth marathich ahe hi post fakt tumachya swagatasathi ahe manjech

! " welcome " !


" शिवराय ऐक वादळ "

शिवराय कविता
वाघासारखी डरकाळी द्यायला नुसत वाघ
असून चालत नाही
त्यासाठी अंगात शिवाचा अंश
असावा लागतो …
रणांगणात उतरून नुसती हाताची मुठ
वळवून चालत नाही
त्यासाठी आई भवानीचा आशीर्वाद
असावा लागतो..
अरे लढाया खुल्या मैदानात असोत
किंवा खवळलेल्या सागरात
जिंकण्यासाठी सह्याद्रीसारखा कणा ताठ
असावा लागतो ..
स्वराज्य उभ करायचं म्हणजे खायचं काम
न्हाय
त्यासाठी रक्ताचा अभिषेक
करावा लागतो..
लढण म्हणजे नुसत प्राण तळहातावर घेवून
चालण न्हवे
त्यासाठी शत्रू सोडाच
त्याच्या घोड्यालाही पाण्यात दिसावं
लागतं..
आग्राहून सुटका..
आणि शास्तेखनाची फजिती..
अहो राजा होण्यासाठी
अफजाल्यासारख्या
पाप्याला वाघासारख फाडावं लागतं..
वाघाच्या घुरघुरण्याला डरकाळीच महत्व
यायला
माझ्या राजांसारख
रयतेचा वाली छत्रपती शिवाजी राजे
असावं लागतं…

फक्त बीजे

! " माझे छञपती " !

छत्रपती शिवराय

तेजस्वी, राष्ट्राभिमानी
जिजाऊचा लाल
शिवबा आमुचा

प्रसाद जगदंबेचा
अवतार शिवाचा
शिवबा आमुचा

सखा मावळ्यांचा
राजा रयतेचा
शिवबा आमुचा

कर्दनकाळ मोगलांचा
रक्षक धर्म अन देशाचा
शिवबा आमुचा

शत्रू अन्यायाचा
न्याय गरीबांचा
शिवबा आमुचा

बुद्धिमंत, श्रीमंत
वीरांचाही वीर
शिवबा आमुचा

मातृभक्त, पितृभक्त
कुलवंत, शीलवंत
शिवबा आमुचा

कर्मयोगी, राजयोगी
प्रज्ञावंत, दयावंत
शिवबा आमुचा

सिंहाचा असे छावा
लढे गनिमी कावा
शिवबा आमुचा

गो-ब्राम्हण प्रतिपालक
हिंदवी स्वराज्याचा जनक
शिवबा आमुचा

जाहला छत्रपती
जाणता राजा
शिवबा आमुचा

दि 19/09/2014 बाजीप्रभू देशपांडे यांचा बलिदान दिवस

आज फार मोठा ऐतिहासिक दिवस आहे
मंडळी .
आजच्याच दिवशी तो पावन खिंडीतील चित्त थरारक दिवस घडला.
६ हजार विरुध्द ३०० जण
लढलेच कसे असतील?
काय माणसे असतील ती ?
 काय ती मंतरलेली रात्र असेल ?
खरंच!  शब्दानाही कोडं पडावं
अशी काही माणसं असतात.............
पन्हाळ गडाहून
अंधाऱ्या रात्रीत पळत त्या पावनखिंडीत
यायचे तेही आडवाटेने.अंतर सहज ४०-५० कि.मी.असेलच की. रात्रभर धावायचे आणि पुन्हा हातात हत्यारे घेऊन शत्रूशी दोन हात करायचे.
३०० विरुध्द ६ हजार....
कसा मेळ बसायचा?
लढाईचे परिणाम काय होणार हे त्या ३०० जणांना माहित असणारच की....
आपण कापले जाणार ,मरणार.पण तरीही लढणार ....
कसली माणसे होती ती..
या असल्या नरवीरांच्या मुळे
मंडळी आज आपण ''मराठा '' म्हणवून घेत आहोत.

६ तास अखंड झुंज द्यायची... त्या आधी रात्रभर धावायचे ....अंगावर काटा आणि डोळ्यात
पाणी येते विचार करता करता.

तोफांचे आवाज कानावर पडत नाहीत तोवर आमच्या बाजींनी जीव सोडला नव्हता...
प्रत्यक्ष यमदेव
त्या पावन खिंडीत तोफांचे आवाज होईपर्यंत थांबला होता... त्या यमालाही वाट बघायला लावणारी माणसे
या महाराष्ट्राच्या मातीने
जन्माला घातली .... मंडळी हे स्वराज्य सुखाने
नाही मिळाले .. हजारो प्राणांचे
बलिदान आहे यामागे.

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा।

फक्त बीजे

Thursday, 18 September 2014

" छोटा व मनमोहक धबधबा " ( किल्ले सिंहगड )

मी आणि गॅरी ( अनिल )आम्ही सहज ऐकेदिवशी पूणेला गेलो . गॅरी त्याच्या भावाकडे गेला .आणि मी माझ्या भावाकडे अतूलकडे गेलो, आम्ही मूकामी काञजला राहिलो . अतूल मणाला बालूभाऊ आपण ऊद्या सिंहगडला जाऊ त्याने असे म्हण ला माझा आनंद गगणात मावेना एकदाची सकाळ झाली आणि मी, अविनाश, अतूल निगालो  सिंहगड च्या दिशेने तेवढ्यात गॅरीचा फोन आला की, मी आणि माझा भाऊ सिंहगड ला जात आहोत. योगायोग बघा मी त्याला मणालो आम्ही पण जातोय. तेव्हा ते आमच्या मागेच होते.
     मग काय झाला आमचा ग्रूप मोठा मग खूप इनजाॅय चालू झाला मोटारसायकल ऐकमेकाच्या पूढे पळवायची रेस चालू झाली. मग पोहचलो ऐकदाच त्या वीर " तानाजी मालूसरे " यांच्या कतृत गाजवलेलया किल्ले सिंहगड च्या पायथ्याशी मग कोणी मणत गाढीने डायरेक्ट वरी जाऊ पण मी मणालो , नाही चालत जाऊ होय नको , होय नको मणून झाले ऐकदाचैे तयार चालत जाण्यासाठी  आणि सूरू झाला आमचा प्रवास . रस्ता तसा एकदमच विचित्र दगड झाडे अडचण आम्ही चाला चालता थकायचो थाबायचो . तितक्यात कोणी तरी मणायचे गाढीने वरी गेलो असतो तर बरे झाले असते. पण त्याची समजूत काढून आम्ही पूनहा चालायला लागलो .  आता आम्ही आध॔ रस्ता पार केला तेवढ्यात आम्हाला जे दिसले ते पाहूण आम्ही सगळे जण थक्क झालो .ते महणजे छोटासा पण मनाला वेड लावणारा धबधबा आणि आम्ही सगळयांनी लगेच आपल्या आपल्या मोबाईल ने फोटोकाढायला सूरूवात केली . तितक्यात मी मणालो ग्रुप फोटो PLZ..

     तो धबधबा पाहून पूढे जाण्याची ईच्छा होत नव्हत . तो ऊचावून पडणारा धबधबा आणि तितकीच ती खोल दरी  ते दृष्य पाहून मी अतिशय मनमोहक त्या धबधब्यांच्या प्रेमात पडलो .

धन्यवाद

          फक्त बीजे

" सरसेनापती प्रतापराव गूजर "

प्रतापराव गुजर।। वेडात मराठे वीर दौडले सात ।।वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते ते शूर सेनानी म्हणजे,प्रतापराव गुजर,विसाजी बल्लाळ,दिपोजी राउतराव विठ्ठल,पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्दी हिलाल व विठोजी होय.प्रतापराव गुजर या महान सेनापतीने मोठा पराक्रम केला होता.त्यांचे व बेलोलखान यामधील युध्द इतिहासात प्रसिध्द आहे.या सात वीरांनी सुमारे बारा हजारच्या बेलोलखानाच्या सैन्यावर चाल करून मोठा पराक्रम केला.ही लढाई कोल्हापूरजवळच्या नेसरी येथे झाली.सभासदाच्या बखरीत प्रतापराव गुजर या महान सेनानीबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे.पन्हाळगडाच्या लढाईच्या समयी नेताजी पालकर समयास न आल्यामुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते.यामुळे राजियांनी नेताजी पालकर यास बोलावून आणिला,आणि 'समयास कैसा पावला नाहींस?'म्हणून शब्द लावून,सरनोबती दूर करून,राजगडचा सरनौबत कडतोजी गुजर म्हणून होता,त्यांचे नाव दूर करून,प्रतापराव ठेविले,आणि सरनोबती दिधली.प्रतापरावांनी सेनापती करीत असतां शाहाण्णव कुळींचे मराठे चारी पादशाहींत जे होते व मुलखांत जे जे होते ते कुल मिळविले.पागेस घोडीं खरेदी केलीं.पागा सजीत चालिले व शिलेदार मिळवित चालिले.असा जमाव पोक्त केला.चहूं पादशाहीत दावा लाविला.विजापूराहून आलेल्या बेलोलखान याने बारा हजार स्वारांनिशी स्वराज्यावर चाल करून मोठा धुमाकूळ घातला होता,रयतेवर अनन्वित अत्याचार केले होते.महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा हुकूम केला.प्रतापरावांनी गनीमीकाव्याने बहलोलखानास जेरीस आणून त्याचा पराभव केला.बहलोलखान आपल्या सैन्यासह शरण आला.शरण आलेल्या बहलोलखानास मोठ्या मनांनी प्रतापरावांनी त्यांस सोडून दिले.रयतेचे हाल करणार्‍या ‍बहलोलखानास सोडल्यामुळे महाराजांनी प्रतापरावांस,'बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका.'असे पत्र धाडिले.राजियांचे पत्र मिळताच प्रतापराव सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले.आपल्या छावणीच्या जवळच असलेल्या नेसरी येथे बहलोलखानाचा तळ पडला आहे.असे हेरांकडून त्यांना कळाल्यावर ते तडक घोड्यावर बसून एकटेच बहलोलखानाच्या छावणीवर चालून निघाले.त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ,दिपोजी राउतराव विठ्ठल,पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्दी हिलाल व विठोजी हे वीर होते.या सात वीरांनी बारा हजाराच्या सैन्यामध्ये घुसून शेकडो गनीमांना ठार मारिले.पण अखेरीस प्रतापराव आणि सोबतचे सहा वीर मरण पावले.केवढे हे शौर्य या सात वीरांचे?साक्षात समोर मृत्यु आहे हे माहीत असून,हजारों सैन्यावरी सात वीर चालून गेले.पराकोटीची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापोठी या सात वीरांनी स्वत:स मरणाच्या हवाली केले.ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतीव दु:ख झाले.या सात वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले.(पुढील पानावर पहा सभासदाच्या बखरीमधील बेलोलखान बरोबरच्या युध्दाचे वर्णन)सात वीरांचे स्मारक,नेसरी(कोल्हापूर)

" मूरारबाजी प्रभू "

छत्रपती बसरूर मोहिम संपवून स्वराज्यात परत येत असताना त्यांना मिर्झाराजे जयसिंग याच्या आक्रमणाची बातमी समजली.स्वराज्यावर आलेल्या या मोठ्या संकटाशी सामना करण्यासाठी महाराज लगोलग राजगडावर पोहचले.शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार मिर्झाराजे जयसिंग याच्या दिलेरखान या सेनापतीने पुरंदराला वेढा घातला.पुरंदरच्या माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले.सभासदाच्या बखरीमध्ये याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता.त्याजबरोबर हजार माणूस होते.याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते.त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले.दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती.त्यात होऊन सरमिसळ जाहले.मोठे धूरंधर युद्ध जहले.मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले.पाचशे पठाण लष्कर ठार जाहले.तसेच बहिले मारले.'मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,'अरे तू कौल घे.मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.'ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?'म्हणोनि नीट खानावरी चालिला.खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारुन पुरा केला.तो पडला,मग खानाने तोंडात आंगोळी घातली,'असा शिपाई खुदाने पैदा केला.'मिर्झाराजे जयसिंगच्या रूपाने स्वराज्यावर आलेले मोघलांचे आक्रमण, परतावण्यासाठी छत्रपती शिवरायांनी ११ जून १६६५ रोजी मिर्झाराजे जयसिंग बरोबर इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह'केला.या तहान्वये तेवीस किल्ले मोघलांना द्यावे लागले.तह करून छत्रपतींनी स्वराज्यावरील संकट परतवून लावल्यामुळे तह करून सुध्दा राजे जिंकले
.पुरंदरावरील मुरारबाजीचे शिल्प

माझ्या बद्दल ( फक्त बीजे )

मिञहो मी तूमचाच एक मिञ तसा मी 96 कोळी मराठा , पण आळशी खूप असाच माझा बोलता बोलता ऐकेदिवशी एका सामाजिक काय॔कत॔ सोबत संबंध आला . आणि विषय चालू माझे दैवत क्ष॓ञिय कूलावंतस "  छञपती शिवाजी महाराज " यांच्या वर पण पूरेसे ज्ञान नसल्या मूळे मी गप्प होतो.
    तितक्यात ऐक जण मला म्हणआला तू मराठा ना?? मग तूला हा इतिहास माहिती हवा .आणि माझे रक्त सळसळे आणि मी कामाला लागलो चालू केला शिवरायांचा इतिहास शोधायला मग काय होणार??? ऐक किस्से छञपतींचे वाचत गेलो तेव्हा कळले देवा पूनहा ऐकदा माझ्या राजाचं स्वरा ज्या हवं मला त्या राजाचा मावळा होयचं आहे . पण ते शक्य नाही म्हणून राजाचा ऐक मावळा म्हणून राजाचा पूर्ण इतिहास, मावळे त्यांची जिद्दीनेऊभा  केलेलं हे देखणं स्वराज म्हणजे आताचा " महाराष्ट्र "  माझ्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी माझा हा ! "" बीजे ऐक वादळ "" ! हा BLOG  मराठीतून खांस तूम्ही च्यासाठी काढलेला आहे तरी ज्यांनी या BLOG ला भेटदिली तयांचे मनपूव॔क आभार

बोला
! जय भवानी !
! जया शिवाजी !
! जय जिजाऊ !

छंद :- लेखन, वाचन, ऐतिहासिक गोष्टीत अत्यंत रस , ऐतिहासिक फोटोग्राफी ( BLOG वरिल सव॔ फोटो मी काढलेले आहेत )
शिक्षण :- एचएसी , आयटीआय ( वायरमन )
पूण॔नाव :- बालाजी जनाध॔न माने

हिरकणीची शौय॔कथा ( हिरकणी बूरूज रायगढ )

हिरकणीची शौर्यकथारायगडावर राजधानी ती होती शिवरायांची ।कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी बुरुजाची ।वसले होते गाव तळाशी वाकुसरे या नावाचे ।राहात होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे ।आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे ।शोभत होते हिरा नाव त्या तडफदार घरवालीचे ।सांज सकाळी हिरा जातसे दूध घेऊनी गडावरती ।चालत होती गुजराण त्या नेकीच्या धंध्यावरती।एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली।ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज टळूनी गेली।सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे ।मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ तान्हे माझे ।हात जोडूनी करी विनवणी म्हणे जाऊद्या खाली मला।गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला।बाळाच्या आठवे झाली माय माउली वेडिपीसी ।कडा उतरूनी धावत जाऊनी बाळाला ती घेइ कुषी।अतुलनीय हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले ।साडी चोळी हिरास देऊनी प्रेमे सन्मानित केले ।कड्यावरी त्या बुरूज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची ।ऐकू येते कथा अजुनी अशी हिरकणी बुरूजाची ।

बीजे

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तलवारी बददल

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या दोन  तलवारी...

१)तळबीड जि. सातारा येथील श्री. हंबीरराव मोहिते यांच्या वंशजानी अजूनही जतन करुन ठेवलेली त्यांची तलवार.

सुमारे 15-16  किलो वजन असलेली ही तलवार अजूनही जशीच्या तशी चांगल्या अवस्थेत आहे. ह्या तरवारीचे coating करून ठेवले आहे त्या मुळे ती आत्ता हि  चागल्या अवस्थेत पाहायला आढळते. स्वराज्याचे सरसेनापतींची ही तलवार पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या

२) सरसेनापती हंबीरराव मोहिते  यांची दुसरी  तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदीरातील भवानी मातेच्या समोर ठेवलेली आहे. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच शिवाजीच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.

या तलवारीला येथे ठेवायचे कारण म्हणजे अफझलखानाशी झालेल्या लढाईत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी केलेला पराक्रम होय..५०० हून अधिक सैनिक मारले होते.

स्वराज्याचे शिल्पकार "हंबीरराव मोहिते " या मर्द मराठ्याला मानाचा मुजरा.

आपला बीजे

हिरोजी इंदूलकर रायगढ किल्ले बांधकाम करणारा हिरा


हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराज्यान कडे होता.रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर सोपावली ...शिवाजी महाराज स्वारी वर गेले...हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला ..आणि पैसा संपला हिरोजिला समजेणा काय करावे ..शिवाजीने तर जबाबदारी टाकली आहे .किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजिने अपूर्ण काम केले.आपला राहता वाडा , आपली जमिन विकली.बायकोसह रायगडावर आला..पैशासह जोपड़ी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली शिवाजीना आल्यावर कळल हिरोजिने काय केले . राज्याभिषे काच्या वेळी त्या शिवाजिना वाटल या हिरोजिंचा सत्कार करावा ..राज्याभिषे काच्या वेळी शिवाजी म्हणाले,"हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय."त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान जुकवून म्हणाला ,"महाराज , उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल .. आम्हाला आणखी काय हवय...."महाराज म्हणाले नाही काही तरी मागितलेच पाहिजे ,त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे ..रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच् या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया .महाराजाना कलेणा हे कसल मागण..पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल ...मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का ...????आणि हिरोंजी उत्तर देतात,"राजे..! ज्या-ज्या वेळी रायगडावर असाल,त्या- त्या वेळी जगदिशवराच् या दर्शनाला तुम्ही याल... ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या-त्य ा वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील ...आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल.."

Wednesday, 17 September 2014

ऐतिहासिक फोटोग्राफी

संभाजी महाराज समाधी स्थळ वढू ( बू
) दश॔न घेताना मी तूमचा बीजे

माझी ऐतिहासिक फोटोग्राफी

क्षेञीय कूलावंतस छञपती शिवाजी महाराज समाधी स्थळ
             
  ! " किल्ले रायगढ " !

"माझी ऐतिहासिक फोटोग्राफी " खास तूम्हीच्यासांठी

ऐतिहासिक पेशवाई शनिवार वाडा पूणे

बाजी पासलकर

बाजी पासलकर हे मोस मावळखोर्यातचे वतनदार.निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून,धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती.अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते.तंटे सोडविण्यात ते हुशार होते.इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या.पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले.छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.तोरणा, सुभानमंगळ,रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता.खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला.मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता.छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले,अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला,पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला.गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.बाजी पासलकर,कान्होजी जेधे,गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली.फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.दोघात तुंबळ युध्द झाले.अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला. त्याशी खासाखाशी गांठ पडली.एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार पडले.मग उभयतांकडील दळ आपले जागियास गेले.        बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.पण दुर्दैव असे की याच धरणाच्या जलाशयात त्यांचा चिरेबंदी वाडा तसेच त्यांच्या वंशजांची शेकडो एकर जमीन बुडाली आहे,याचा मोबदला त्यांना शासनाकडून अजूनही मिळाला नाही.त्यांचे वंशज आजही त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम करत आहेत.

या सह्याद्रीला, या स्वराज्याला, या शिवराज्याला आपल्या रक्ताने अभिषेक घालणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा...मिञहो शिवरायांचे अनेक मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण दिले त्यांना या मावळयाची


प्रेमाचा अथ॔

प्रेमाचा अर्थ ..सकाळी डोळे उघडण्यपूर्वीज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे.मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतोते प्रेम आहे..भांडून सुधा ज्याचा राग येत नाही ते प्रेम आहे..ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे..ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटतेते प्रेम आहे..स्वताला कितीही त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतो ते प्रेम आहे..ज्याला लाख विसरण्याचा प्रयत्नकरा विसरता येत नाहीते प्रेम आहे..कुटुंबाच्या फोटो मध्ये आई-बाबाच्या सोबतज्याचा फोटो असाव आपल्याला वाटतेते प्रेम आहे..ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येतेते प्रेम आहे..हि पोस्त वाचताना प्रत्येक ओळीलाज्याची आठवण आलीते प्रेम आहे ..प्लीज हे जरूर वाचा...मी घर विकत घेऊ शकतो पण त्या घराचे घरपण नाही...घड्याळ विकत घेऊशकतो पण गेलेली वेळ नाही...मी मोठे पद विकत घेऊ शकतो पण आदर नाही...मी मखमली गादी विकत घेऊ शकतोपण शांत झोप नाही...मी पुस्तक विकत घेऊ शकतो पण विद्या नाही...मी औषधे विकत घेऊ शकतो पण चांगले आरोग्य नाही...मी रक्त विकत घेऊ शकतो पण कोमेजून जात असलेले जीवन नाही...पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवा पणत्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका...पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका...माणसासाठी पैसा बनला आहे पैश्यासाठी माणूस नाही हे नेहमी लक्षात ठेवा...आपले मित्र हे आपले धन आहे वेळ काढ़ा भेटा बोला हेप्रेमाने मिळतेजपून ठेवा.

मी ऐक शिवरायांचा मावळा आणि ऐक लेखक बीजे आज माझ्या स्वप्नातला blog सूरू करतोय तरी मिञहो तूमचे या blog वर मनपूव॔क स्वागत