Wednesday, 7 October 2015

! " राजगढ एक सप्नपूण॔ " !

किल्ले राजगड:



 हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड! शिवतिर्थ रायगड! हिंदवी स्वराज्याची राजधानीगडांचा राजा, राजियांचा गडराजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर अन्‌ भोरच्या बायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभे असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो.

Monday, 1 June 2015

!!! " वीर शिवा काशिद " !!!

: शिवा काशिद हा एक शिवरायाचा सरदार होता.त्याने शिवरायाच्यावर व आपल्या स्वराज्यावर आलेल्या संकटाचे निवारण
करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले म्हणुन शिवाजीराजे सुखरुप् सिददी जोह‍रच्या वेढयातुन सुटुन आले व विशाळगडावरति
पोहचले .शिवा काशीद हा हुबेहुब शिवरायासारखा दिसत होता. त्यामुळे सिद्दि जोहरला वाटले कि हाच शिवाजी ! म्हणुन त्याने
व त्याच्या सरदारांनी शिवा काशीदला पकडले व हा शिवाजी नाही असे कळताच जोहर म्हणतो कसा ‘शिवा काशीद आता तु
मरणाला तयार हो’.ते ऐकुन शिवा काशीद म्हणाला ‘शिवाजीराजे आता सुखरुप् वेढयातुन सुटले असतील आता मी सुखाने
मरण्यास तयार आहे’.तसेच शिवरायासाठी हजारदा मरण्यास मी सुखाने तयार आहे’. हे ऐकुन जोहरने त्याचे शिर कापुन टाकले
.अशा प्रकारे शिवा काशिदला वीर मरण आले.अशा या वीर मावळ्याचा पराक्रम अजुनही जनतेस माहीत नाही.इतिहास:
(म‍राठयाचा)इतिहास हि त्याच्या पराक्रम विसरु शकणार नाही,कारण शिवा काशिद सारख्या मावळ्याच्यामुळेच व त्याच्या
बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवाजीराजे साकार करु शकले. म्हणुनच रयत सुखाने व स्वाभिमानाने जगु लागली.
शिवा काशिद या मर्द मावळ्याची समाधि अजून हि पन्हाळगडाच्या पायथ्याशी विशाळगडाकडे जाणार्‍या वाटेतिल गावापाशी
दुरावस्थेत आहे.
शिवा काशिद हा महाराजांचा न्हावी होता. त्याची अंगकाठी रुपरेषा ह…ीशिवाजी महराजांसारखिच होती. जर शिवा काशिदास
महाराजांचे कपडे घातले तरनवीन माणुस नक्की फ़सेल. त्या रात्री पन्हाळगडावरुन दोन पालख्या निघाल्या.एक महाराजांची
आणी दुसरी शिवा काशिद. एक विशाळगडाकडे व दुसरी सिद्धीजोहरकडे.हे तर आपण जाणलच असेल की सिद्धी जोहरकडे गेलेला
शिवाकाशिद वीर मरणास प्राप्त झाला. पण मरण्या आधी प्रहर दोन प्रहर का होइना एकसामान्य मावळा राजा झाला. स्वत:
मृत्युच्या मुखात गेला जेण�
[: जेणे करुन त्याचाराजा काही अंतर का होइना शत्रु पासुन दुर जाइल.धन्य ते शिवाजी महाराज आणि
धन्य त्यांचे मावळेसुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाहीपुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी
मोगलाईनिघाली एक फ़ोज मोठी विजापुरीमहराज होते त्यावेळी कोल्हापुरीवेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने४० हजारी
फ़ोज लढत होती जिद्दीनेउन पावसाची न करता तमा फौज लढली महिने चारवेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे
पारकरुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारेफ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारेरात्री एक शोधुनि
बिकट वाट गडावर आला हेर महादेवगडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेवपाहत होते वाट राजगडी सर्वासह

मॉ साहेब जीजाईगाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बातजणु
 काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघातअंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महारांजा सारखीकरुनी राजांचा पोषाख
 भुलवण्यास गनीम तयार
दुसरी पालखीशिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरणपण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरणप्रगटता रुप खरे शिवा
काशिदचे, किंचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितोमरताना शिवा काशिद बोलतो “सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो?”
समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंतस्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंतगजापुरच्या घोड खिंडीत
बाजी प्रभुनी घडवला एक इतिहासपण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास

!!! "आठवण राजांची " !!!



एकदा एक 'मावळा' गंभीर जखमी झाला होता....

तो घरी पडुन असताना,
जाणते राजे त्याला भेटायला गेले असता,
राजांना पाहून तो मावळा रडू लागला....

'राजे' म्हणाले - "लवकर बरा होशील,कशाला रडतोस?"...

परंतू......

तो मावळा म्हणाला-"मला याचे रडू येत नाही,
की मला उठता येत नाही; श
तर मला या गोष्टीचे रडू येत आहे की, माझा राजा माझ्या समोर असून, मी मुजरा करु शकत नाही."

बीजे एक वादळ

Saturday, 20 September 2014

! " स्वप्नातील कासपठार सातारा " !

कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्हयाचा लौकीक नोंदविला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून पर्यटकांची रिघ कास पठाराच्या दिशेने सुरु झाली आहे. या पठाराची माहिती देणारे www.kas.ind.in हे संकेतस्थळ आहे. कास पठार हे वर्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेलया पश्चिम घाटातील 39 ठिकाणापैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदासमोर पश्चिम घाटाला जागतीक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले आहे. त्यातील कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे. कास पुष्प पठाराचे नैसर्गिक आणि निसर्गदत्त देणगीची जोपासना करून या पठाराचा विकास करण्यात वन विभागाने पुढाकार घेतला आहे. कास पुष्प पठाराची जैव विविधता जोपासून ती वाढविण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्थाचा मोठा वाटा आहे. कास पठाराची समुद्रसपाटी पासूनच उंची 1213 मिटर असून पर्जन्यमान अंदाजे अडीच ते तीन हजार मि.मी. इतके आहे. कास पठार हे 1792 हेक्टरवर पसरले असून यामध्ये वनखात्याची 1142 हेक्टर तर खाजगी 650 हेक्टर जमीनीचा समावेश आहे. कास पुष्प पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे 850 पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचा अधिक समावेश आहे. तसेच किटक व विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या 32 प्रजाती आढळतात. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 19 प्रजाती, सस्तन प्राण्याच्या 10 प्रजाती आणि पक्षांच्या 30 प्रजाती येथे आढळून येतात. कास पठार व परिसरात प्रदेशनिष्ठ, दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती आहेत. रेड डाटा बुकमध्ये जवळपास 40 फुले असणाऱ्या प्रजाती कास पठारावर आढळतात. कास पठरावरुन सुक्ष्म हवामान हे जैविक घडामोंडीना उत्क्रांतीला पोषक आहे. कास पठारावर जाणारा प्रत्येकजण येथील विविधांगी फुले आणि वनस्पतीकडे आपोआपच आकर्षिला जातो. कास पुष्प पठारावर पुष्प आणि वनस्पतीमुळे येथील वातावरण रंगीबेरंगी असून कधी पांढरा शुभ्र, कधी लाल, निळा, जांभळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे फुले पर्यटकांच्या डोळयांचे पारणे फेडतात. या फुलांवर पसरणा-या इंद्रधनुष्यीछटा पाहण्यास मिळत असून हा परिसर जणु स्वप्नसृष्टीत पोहोचविणाराच ठरतो. कास पठाराला जाताना नागमोडी वळणे आणि घाट संपताच विस्तीर्ण असे पठार डोळयात भरते, हेच ते ऐतिहासिक प्रसिध्द कास पठार आहे. निसर्गाची देणगी लाभलेल्या कास पुष्प पठाराला डोळयांचे पारणे फिटाव्या अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरले आहे. या पठारावर बोचरा वारा पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असलेल्या हलक्या सरी, गर्द धुके आणि हिरव्यागार विविध रंगाच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे कास पुष्प पठार परिसर जणु धरतीवरचाच स्वर्ग असल्याचा भास येथे येणा-या प्रत्येकालाच होतो. या पुष्प पठारावरील क्षणात सुर्यकिरणांतील इंद्रधनुष्यीछटा तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांचाही हवे-हवेसेपणा प्रत्येकालाच मोहात पाडत असून जणू धुक्यात न्हाऊन जावे अशीच मनोमन इच्छा या परिसराच्या आकर्षणाने होत आहे.महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगर रांगा म्हणजे सह्याद्री, सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसगिर्क खजिनाच महाराष्ट्राला बहाल केला आहे. सह्याद्री म्हणजे जैवविधता असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. जगातील महत्वाच्या अठरा ठिकाणांमध्ये सह्याद्रीचा समावेश होतो. कास पठार हा त्याचाच एक भाग असून त्यास कास पुष्प पठार असेही म्हणतात. कास पठाराला सडाही संबोधिले जाते. या सड्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे 1213 मीटर एवढी आहे. कास पठार हे कातळ खडकाचे कमी प्रमाणात माती व अन्य द्रव्य असलेले पठार आहे. या ठिकाणी झाडे उगवत नाहीत. मात्र पावसाळ्यात रानफुले व पुष्पवैभव सर्वांनाच जादूमय भुरळ घालतात. कास पठारावरील लक्षावधी फुले विविध रंगांनी विविध ढंगांनी उगवतात. निसर्गाचे हे देखणं रुप आता सर्वांनाच मोहात पाडते.कास पठारावर पावसाळा संपता संपता ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात रानफुले येतात. ही रानफुले विविध प्रकारची असतात. हिरव्यागार गालीच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वा-याची झुळुक आली की डोलणारी पांढरी अशी नानाविध रंगाची फुले अक्षरश: मनमोहून टाकतात. यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे दर पंधरा दिवसांनी त्यांचे रंग बदलत असतात. काही फुले दरवर्षी येतात तर काही फुले दर सात वर्षांनी येतात. तर दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी हे तर कास पठाराचे वेगळे वैशिष्ट आहे. हा दैवदुर्लभ योग पाहणारा तसा भाग्यवंत म्हणावा लागेल. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या पठारावर सुमारे 850 पेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार आढळून येतात. यामध्ये फॅमिली, जिनेरा जाती आणि औषधी वनस्पती नोंदविल्या आहेत. जून महिना संपताच कास पठारावर सड्यावरचा चमत्कार दिसू लागतो. बालकवींच्या शब्दात सांगायचे झाल्यास हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे असं हे देखणं रुप म्हणजे कास पठारावरील पुष्पवैभवच आहे. या पठारावर हिरव्यागार मखमली गालिच्याचा रंग मात्र आठ-पंधरा दिवसांनी बदलतो. पांढरा शुभ्र, लाल, निळा, जांभळा, पिवळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे हे पुष्पवैभव डोळ्यांचे पारणे फेडते. या पठारावर जून महिना संपतानाच पांढरे हबे आमरीचे कोंब उगवतात. तसेच दोन तु-याची वायतुरा ही वनस्पती दिसते. हीच ती ऍ़पोनोजेटोन सातारन्सीस म्हणजे सातारा कास स्पेशल फूल. लगेचच पिवळी सोनकी आणि कवळयाची मिकीमाऊस सारखी स्मिथियाची फुले उगवतात. मिकीमाऊस फुले ही पिवळया रंगाची असून ही फुले मिकीमाऊससारखी सतत हातात घेऊन मिरवण्याचा मोह येथे येणा-या प्रत्येकालाच आवरता येत नाही. पण पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनीच मोह टाळून या निसर्गदत्त पुष्प पठाराचे नजरेत संकलन करावे. श्रावणात निळी सीतेची आसवे आणि लाल रंगाची तेरड्याची फुले, मध्ये-मध्ये पांढऱ्या गेंदांच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे फुललेले दिसतात. हे नयनरम्य दृष्य पाहताना प्रत्येकाचे मन हेलावून जाते. या फुलांचा बहर कमी होईपर्यंत पांढरे तुरेवाली आमरी वर येते. मोठ्या तळ्यामध्ये पांढरी छोटी-छोटी कुमुदिनीची कमळे संपूर्ण तलाव झाकून टाकतात. तळयामध्ये जणू साठा करून ठेवल्यासारखी कमळांची फुले असून अलगद एखादा स्नॅप घेऊन तो संग्रही ठेवण्याचा मोह प्रत्येकालाच पडतो. या पठारावर कंदी पुष्पांचे विविध प्रकार निचुर्डी, अबोलिमा, ब्युगोनिया, दीपकांडी, चवर, गौरीहार, रानहळद, आभाळी, नभाळी, हत्तीची सोंड, सापकांदा, नागफणी, शेषगिरी, ड्रॉसेरा इत्यादी नाना प्रकारची फुले उगवतात. कास पुष्प पठारातील जैव विविधा जोपासण्यासाठी पयर्टकांबरोबरच सर्वांनीच स्वत:वर बंधने घालून घेणे गरजेचे आहे. कास पठारावरील विविध जैव विविधतेचे रक्षण करण्यासाठी या परिसरात तार कुंपन उभारण्यात आले असून या पुष्प पठारावर प्रवेश शुल्कही आकारलाही जात आहे. कास संरक्ष्ण समितीच्या वतीने प्रति माणसी 10 रुपये प्रमाणे प्रवेश शुल्क (12 वर्षावरील )आकारले जाते. प्रवेश शुल्क आता ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून यासाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर माहिती मिळेल तसेच forst.satara68@gmail.com या ई-मेल आरक्षणाबाबत संपर्क साधावा. याबरोबरच वाहनांमुळे वाहुक व्यवस्था कोलमोडूनये म्हणून ऑगस्ट ते ऑक्टोंबर या कालावधीत सातारा ते बामणोली रस्त्यावरील कास पठार 15 ते 21 किलोमिटर व राजमार्ग फाटा 0 ते 6 किलो मिटर अंतरात सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत वाहनांना थांबण्यास रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या परिसरात सर्व वाहनांना बंदी केली आहे. काविर्च्या फुलांची झुडपे कास पठारावर मोठ्या प्रमाणावर दर सात वर्षांनी येतात. या फुलांपासून काविर्चा मध मिळतो. काविर्चा मध आयुर्वेदिक म्हणून वापरण्यात येतो. लहान मुले तसेच वयोवृध्द व्यक्ती यांच्यामध्ये कॅल्शियम वाढण्यासाठी काविर्चा मध अत्यंत उपयुक्त आहे. येथील काही वनस्पती दुमिर्ळ असून काही कीटक भक्षी तर काही वनौैषधी आहेत. दरवर्षी येथे देशी - विदेशी शास्त्रज्ञ दुर्मिळ फुलांचा अभ्यास करण्यासाठी तर अलीकडील काही वर्षात मोठया प्रमाणावर पर्यटक नियमितपणे कास पठारला भेट देतात. एकंदरीत सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्प पठाराचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला असून आज देशवासियाबरोबरच परदेशी पर्यटकांना भुरळ घालणाने पुष्पसौदर्य नजरेत साठवून ठेवण्यासारखे आहे. त्यामुळेच कास पुष्प पठार हे प्रत्येकाच्याच जीवनातील एक अपूर्व पर्वणीच ठरत आहे.



Friday, 19 September 2014

! स्वराज्याचा शिलेदार !

स्वराज्याची गौरवगाथा

स्वराज्याचा श्रीगणेशा .........रायरेश ्वरया रायरेश्वराच्या साक्षीनेच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या शपथा घेतल्या. ‘हर हर महादेव’च्या घोषणांमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात या रायरेश्वराने पाहिली.राजकारणामुळे रायरेश्वर सारख्या शिवकालातील महत्त्वाच्या स्थानाची झालेली उपेक्षा त्यांच्या देहबोलीतून वारंवार व्यक्त होत ,..रायरेश्वर म्हटले की, ‘स्वराज्याची स्थापना’ हा इतिहासातील रोमांचकारी प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतोछत्रपती शिवरायांनी त्यांच्या स्वराज्याचा श्रीगणेशा करण्यासाठी या रायरेश्वराचीच निवड केली... त्या दिवशी कुणालाहीचाहूल लागू न देता शिवबा आणि त्यांचे मावळे इथे एकेक करत जमले. कोण होते यामध्ये? दादाजी नरसप्रभू गुप्ते, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सोनोपंत डबीर असे स्वराज्यनिर्मित ीतील बिनीचे शिलेदार! सारे एकेक करत जमले आणि या रायरेश्वराच्या साक्षीनेच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या शपथा घेतल्या. ‘हर हर महादेव’च्या घोषणांमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात या रायरेश्वराने पाहिली.रायरेश्वराच्या पूजाअचेर्ला शिवा जंगम नावाच्या कर्नाटकातील पुजाऱ्याची नियुक्ती झाली होती. त्यांची पस्तीस एक कुटुंबे मंदिराच्या परिसरात आहेतकोट्यावधी रुपये खर्चून मंुबईच्या समुदात शिवाजीमहाराजांच ा भव्य पुतळा बसवण्याचीयोजना साकारत आहे. मात्र शिवरायांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने पावन झालेली सह्यादीच्या कडेकपारीतील अनेक महत्त्वाची ठिकाणं अद्यापही दुर्लक्षीत आहेत,भोर, पेशव्यांचे पंत सचिव शंकरजी नारायण यांचे वैभवशाली संस्थान. सह्यादीच्याडोंगररांगांनी वेढलेला तालुका. लागूनच सातारा आणि रायगड जिल्हा.रायरेश्वर ४५८९ फूट उंच असून पूर्व-पश्चिम असा १६ किलोमीटर पसरला आहे. रायरेश्वर सुरू झालेली ही डोंगररांग शंभू महादेव रांग म्हणून प्रसिद्ध आहे.परंतु मंदिराची अवस्था पाहून इतिहास जनत करून ठेवण्याच्यावृत्तीचा आपल्यामध्ये असलेला अभाव सातत्याने जाणवतराहतो. हवा स्वच्छ असेल तर भोवतालचे १२ किल्ले आणि चार धरणांचे विहंगम दृश्यसहज दृष्टीस पडतेएक ऐतिहासिक आणि थंड हवेचे ठिकाण म्हणूनहीया डोंगराचा विकास होऊ शकतो. महाराष्ट्राच्या पर्यटन खात्याला आता डोंगर किल्ल्यांची आठवण झाली आहे. नाहीतर कोरीगडासारखा हा डोंगरही एखादा खाजगी विकासक केव्हा ताब्यात घेईल हे कळणारही नाही.- जय भवानी जय शिवाजी

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
छायाचित्रे रायरेस्वर मंदिर ( फक्त बीजे )

! " खंडेरायाची सोन्याची जेजुरी " !

जेजुरीसम पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी
अन्‌ तिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी, कडावरी

यळकोट यळकोट जय मल्हार

जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
वाईच्या तू गणराया जागराला या या
पसरणीच्या भैरी देवा जागराला या या

जेजुरगडा वाजे चौघडा वाजे चौघडा
पुणं धरती ही पलिकडं, गड जेजुरी अलिकडं

रूप दावून बानू गेली, स्वारी देवाची येडी झाली
बानूबाईचं याड लागलं, मल्हारी देव मल्हारी

इसरून गेला कुण्या झाडाला भंडारी देव भंडारी
येळकोट येळकोट बोलती हो नितकाय भंडार उधळती
नवलाख पायरी गडाला हो, चिरा जोडिला खडकाला
अवं बोला हो तुम्ही बोला, अवं म्हाळसा नारीला

अन्‌ भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला
मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी

अवं गळा घालितो भंडारी देव मल्हारी
मल्हारी मार्तंड जय मल्हार

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी
बानू नार आणली घरी मल्हारी रुसला का मजवरी
लखलख दिवट्या जळती पाजळली दीपमाळ
रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी

कडेकपारी त्रिशूळ द्वारी वर उधळे भंडार
नाथ निरंजन सद्गुरू स्वामी घेतलासे अवतार
घेतलासे अवतार देवा लोटलासे भंडार
रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी

मल्हार धनी मी म्हाळसा राणी
कर जोडुनी लागतो चरणी
प्रीत नको तुजवरी, प्रीत नको तुजवरी
रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी




@
श्रीक्ष॓त्र जेजूरी मंदिर@

WELCOME GYZ MY BLOG

Mitraho mi hi post lihtoy English madhe pn actually yacha earth marathich ahe hi post fakt tumachya swagatasathi ahe manjech

! " welcome " !